⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

Gold Silver Rate : जळगावात सोन्याचा भाव 65 हजारांच्या उंबरठ्यावर, चांदीत दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । एकीकडे लग्नसराई सुरु असून यातच सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. सोन्याने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. जळगावात सोन्याचा दर ६५ हजार रुपयाच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीत दिलासा मिळताना दिसत असून चांदीचा दर स्थिर आहे.

सोन्यातील भाववाढ सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहत सोन्याचे भाव ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तर जीएसटीसह हे दर ६६ हजार रुपयांवर गेले आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे मागणीत मोठी वाढ झाली आहे.

यामुळे सोन्याचा दर नवनवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. दरम्यान, आता तर सोने ७० हजारांचा लवकरच टप्पा गाठणार असा अंदाज आहे. जागतिक संकेतांआधारे हा अंदाज वर्तविल्या जात आहे.

आजचे जळगावातील भाव ?
सध्या जळगावच्या सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ५९,५०० रुपयावर तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६४,९०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ७३५०० रुपयांवर आहे.