अ‍ॅपेचा टायर फुटला, रीक्षा रस्त्याच्या कडेला कलंडली

नोव्हेंबर 21, 2022 6:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या जवळ अ‍ॅपे रीक्षाचे टायर फुटूल्याने अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून त्याच्यावर यावल ग्रामीण भागामध्ये उपचार करण्यात आले, त्याची प्रकृती स्थिर आहे.

accident 34 jpg webp

यावल-भुसावळ रस्त्यावर अ‍ॅपेरीक्षाद्वारे कुणाल विठ्ठल कोळी (27, रा. भुसावळ) हा तरुण जात असताना भुसावळ-रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाजवळ अ‍ॅपेचा टायर फुटला व रीक्षा रस्त्याच्या कडेला कलंडल्याने कुणाल विठ्ठल कोळी याच्या पायाला दुखापत झाली. त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.मोहनीश शेख, अधिपरीचारीका मनिषा धांडे, विजय शिंदे आदींनी उपचार केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now