⁠ 
शनिवार, मे 4, 2024

अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीट ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । गडखांब ते दहिवद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीट ठार झाला. ही घटना १९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

पाण्यासाठी भटकंती

उन्हाची तीव्रता वाढल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. ही भटकंती मुक्या प्राण्यांसाठी प्राणघातक ठरत आहे. पाण्याच्या शोधात असलेले वन्यजीव गावाच्या दिशेने किंवा रस्त्याच्या दिशेने येतात. याच पद्धतीने भरदुपारी पाण्याच्या शोधात असलेले वयस्क काळवीट गडखांब ते दहिवद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाले. तोंडाला आणि कमरेला जबर मार झाल्याने काळवीटाचा मृत्यू झाला. सागर मोरे यांना मृत काळवीट दिसले. त्यांनी लागलीच वनपाल पी.जे. सोनवणे यांना दूरध्वनीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. काळवीटचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नेला. त्याानंतर काळवीटवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती वनपाल सोनवणे यांनी दिली.