जिल्ह्यात शिवसेनेला अजून एक खिंडार : या नेत्याने दिला राजीनामा

ऑगस्ट 11, 2022 1:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२  तुषार सांडूसिंग पाटील यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

uddhav thakre 2 jpg webp

या पत्रात त्यांनी “गेल्या १८ वर्षांपासून विद्यार्थी सेनेपासून शाखाप्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख आणि उपतालुका प्रमुख यानंतर १५ वर्षापासून यावल उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी सांभाळत होतो; परंतु दीड वर्षापूर्वी संघटनेच्या बैठकांना पासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचं सांगत पक्षात काम करत असताना डावलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमूद करत या सर्व प्रकाराला कंटाळून नाइलाजाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी आपल्या राजीनामा शिवसेना गटाचे पक्षश्रेष्ठी रवींद्र मिर्लेकर व पारकर यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात देखील शिवसेना दोन्ही गटाचे समीकरणे बदलणार असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यासह यावल व रावेर तालुक्यात बाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.

यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच, आणि विद्यमान सदस्य, विकास सोसायटी संचालक, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संचालक आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जळगाव जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील यांनी ई-मेल द्वारे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षश्रेष्ठी रवींद्र मिरलेकर व पारकर यांच्याकडे दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now