जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांना १५०० रुपये दिले जात आहे. अशातच आता ‘लाडक्या बहिणीं’ना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार आहे. सरकारने लाडक्या बहिणींना भेट म्हणून साड्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक (Ration Card) असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे.
कधी होईल साड्यांचे वाटप ?
रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. साधारण मार्च महिन्याच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरण सुरू होऊ शकते.
या साड्या फक्त अंत्योदय शिधापत्रिकांवर दिल्या जाणार आहेत. एका कार्डावर एक साडी याप्रमाणे साड्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी होळीपर्यंतचा कालावधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्या साड्यांच्या दर्जा कसा असेल? याबाबत चर्चा होतेय.