फिर्याद देण्यासाठी आलेल्या हद्दपार महिलेवर आणखी एक गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । दरोडा, जबरीलूट, मारहाण, चोरी अशा गंभीर गुन्ह्यात हद्दपार केलेली एक सराईत महिला गुन्हेगार शनिवारी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात एका प्रकरणात फिर्याद देण्यासाठी आली. दरम्यान, शहरात येण्यास बंदी असताना तिने प्रवेश केल्याने पोलिसांनी तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला.

crime 2022 06 06T102310.368

कल्पनाबाई हिरामण जगताप (रा. लाकुडपेठ, शिवाजीनगर, जळगाव), असे या महिलेचे नाव आहे. कल्पनाबाईसह तीचा मुलगा व मुलगी या दोघांना देखील शहरातून हद्दपार केले आहे. कल्पनाबाई फुले मार्केट परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करीत होती. या ठिकाणी तीने स्थानिक व्यापारी, विक्रेत्यांशी अनेकवेळा भांडण केले. दरोडा, जबरी लुटीच्या गुन्ह्यात ती संशयित आहे. आठपेक्षा जास्त गंभीर गुन्हे तीच्या विरुद्ध दाखल असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी करुन तीच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. १३ ऑगस्ट २०२१ पासून कल्पनाबाई हिला एक वर्षासाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, एका प्रकरणात तीला फिर्याद द्यायची असल्याने शनिवारी ती रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांच्या परवानगीशिवाय ती शहरात आल्याने तिच्यावर हद्दपार कारवाईचे उल्लंघन केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now