जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२। मुंबई येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशातील वेगवेगळ्या प्रांताचे पदाधिकारी आणि प्रांत यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे आणि कार्याध्यक्ष प्राचार्य नरेंद्र पाठक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या प्रांत रचनेत विदर्भ प्रांत, देवगिरी प्रांत, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि कोकण प्रांत असणार आहेत. देवगिरी प्रांत रचनेत अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक व प्रकाशक श्रीकांत उमरीकर (संभाजीनगर) औरंगाबाद, कार्याध्यक्ष पदी डॉ.पुरुषोत्तम पाटील, जळगाव, प्रांत मंत्री पदी प्रा.विजय लोहार यांची निवड करण्यात आली आहे.
देवगिरी प्रांत कार्यकारिणी अशी असेल.
अध्यक्ष – श्रीकांत उमरीकर, संभाजीनगर, कार्याध्यक्ष – प्रा.डॉ.पुरुषोत्तम पाटील, जळगाव,उपाध्यक्ष – प्रा.रवींद्र बेंबरे, देगलुर ( लातूर),उपाध्यक्ष – प्रदीप नणंदकर, लातूर’कोषाध्यक्ष – प्रा.संजय गायकवाड, संभाजीनगर,प्रांत मंत्री – प्रा.विजय लोहार, जळगाव प्रांत संगठन मंत्री – शशिकांत घासकडबी, नंदुरबार,प्रांत प्रचार प्रमुख – उमेश काळे, संभाजीनगर, संरक्षक – अड.सुशील अत्रे, जळगाव,सदस्य – प्रभा बैकर, धुळे, सदस्य – शैलेश काळकर, अमळनेर
2022-23 करिता नियुक्त या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी कडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतातील विविध भाषा आणि साहित्य विषयाशी निगडित कार्याला आपापल्या प्रांतात गती देण्याचे दायित्व सोपविण्यात आले आहे.