⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | जळगावच्या चित्रकाराचे मुंबईतील नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत होणार चित्रप्रदर्शन

जळगावच्या चित्रकाराचे मुंबईतील नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत होणार चित्रप्रदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । पुणेस्थित असलेले जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मस्कावद येथील करिश्मा सपकाळे या नवोदित चित्रकाराचे मुंबईतील वरळी येथील नेहरु सेंटर आर्ट गॅलरी येथे उद्या दि. ३१ पासुन ‘अनहद’ हे चित्रप्रदर्शन भरणार आहे. त्यांच्यासोबत पुण्यातील चित्रकार तुषार देसाई आणि महेश तळपे या दोन नवोदित चित्रकारही आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणार आहे.

या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक अक्षय इंदिकार, चित्रकार आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या खजिनदार अलका बोरा आणि आर्किटेक्ट शिक्षणतज्ञ संजय म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामध्ये निसर्ग चित्रण, व्यक्तिचित्रण तसेच मुर्त-आमुर्त स्वरुपातील आर्किलीक तैलरंग आणि जलरंगातील कलाकृती पहायला मिळतील. नवोदित चित्रकार करिश्मा सपकाळे ह्या महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथील माजी कलाशिक्षक निळकंठ सपकाळे यांच्या कन्या होत. प्रदर्शन रसिकांसाठी ६ जुन सायंकाळी सात वाजेपर्यंत खुले असणार आहे. कलाप्रेमींनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करिश्मा सपकाळे व चित्रकारांकडुन करण्यात आलेले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह