बाप रे.. दर्शनाला आलेल्या भाविकांची दुचाकी लंपास करण्याचा प्रयत्न, पण.. नागरिकांनी!

ऑगस्ट 28, 2022 1:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । जामनेर रोडवरील साई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची दुचाकी लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास नागरिकांनी पकडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मात्र, एक संशयीत पसार होण्यात यशस्वी झाला. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 26 jpg webp

विष्णू काशीनाथ कोळी (19), अतुल भास्कर कोळी (23), राहुल मगन कोळी (22, सर्व रा.किन्ही) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. भुसावळातील शिवकुमार विनोद खराडे (पंढरीनाथ नगर) हे गुरुवारी रात्री 8.40 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरात देवदर्शनासाठी आले असता दुचाकी (एम.एच.19 डी.एम.9677) ही मंदिराबाहेर त्यांनी पार्क केली मात्र काहीच वेळेत चोरट्यांनी संधी साधल्यानंतर खराडे यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात चोरटे गाडी लांबवताना दिसून आले.

खराडे हे पोलिस ठाण्यात येत असताना खान्देश हॉटेल समोरील गल्लीतून चोरटे त्यांच्याच गाडीवर दिसल्याने त्यांनी संबंधिताना हटकल्याने उलट चोरट्यांनी धक्काबुक्की केल्याने बाजारपेठ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर तिघा चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास निलेश चौधरी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now