भुसावळ
लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांना आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । लेवा पाटीदार समाजातील वधू-वर सूचित नाव नोंदणी सुरू असून समाजातील विवाह ईछुकांनी नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. जगभरातील लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांची वधु-वर सुची नाव नोंदणी 2022-2023 लेवा नवयुवक संघ जळगावद्वारा जगभरातील 250 सेंटरद्वारा संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या सुचीत नाव नोंदणीसाठी लागणारे फार्म भुसावळ येथील आपले परीवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळा रोड येथे सकाळी 7 ते 11 या वेळात उपलब्ध आहेत. सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांनी आपली नावे नोंदवावी, असे आवाहन पराग पाटील, प्रमोद सरोदे, श्रीकांत पाटील व संचालक मंडळाने केले आहे.