⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

रस्त्यावर भाजीपाला विक्रीची दुकाने, पोलिसांनी ८ जणांना दिली नोटीस

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरात मार्गावर भाजीपाला विक्रीची दुकाने लावणाऱ्या ८ जणांना शहर वाहतूक शाखेने बुधवारी नाेटीस बजावली.

कोरोना काळात बाजाराचे विक्रेंद्रीकरण झाल्यावर काही भाजीपाला विक्रेते शहरातील डाॅ.आंबेडकर मैदानावर दुकाने लावत होते. आता त्यांना मैदानावर बसू दिले जात नाही. त्यामुळे अनेक जण रस्त्यावर दुकाने लावतात. तेथे येणाऱ्या ग्राहकांमुळे रस्त्यावर गर्दी होऊन अपघात होऊ शकतो. दाेन दिवसांपूर्वीच अशी दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक शाखेने विक्रेत्यांना रस्त्यावर दुकाने लावू नये अशा सूचना दिल्या होत्या. बुधवारी वाहतूक शाखेचे एपीआय स्वप्निल नाईक यांनी पुन्हा ताेंडी सूचना दिल्या. तरीही विक्रेते न उठल्याने ८ जणांना नोटीस बजावण्यात आली. प्रदीप पाटील, सुनील शिंदे, भाऊसाहेब पाटील यांनी ही कारवाई केली.

हे देखील वाचा :