गुन्हेजळगाव जिल्हामहाराष्ट्र

ओव्हरटेक करतांना ट्रक व आयसर गाडीला अपघात : भरलेली कोबी रस्त्यावर पसरली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ एक मोठा अपघात झाला. यावेळी एकमेकांना ओव्हरटेक करतांना ट्रक व आयसर गाडीला हा अपघात झाला. यावेळी ट्रक उलटला. पर्यायी मध्ये भरलेली कोबी रस्त्यावर पसरली होती. पसरलेल्या कोबीमुळे चार ते पाच तास वाहतुक ठप्प झाली.

संबंधित ट्रकच्या जखमी चालकास उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आहे. मदत कार्यासाठी महमार्ग पोलिसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखील पोउपनि.भागवत पाटील, एपीआय रूपाली पाटील, एएसआय प्रताप पाटील, पोकॉ. सुनील पाटील, अशोक चौधरी, पो.हा. योगेश बेलदार, विरेंद्रसिंग सिसोदे, पो.ना. जोशी, वसीम शेख, पो.कॉ.धनंजय सोनवणे, ईशांत तडवी, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे प्रवीण सगिले आदींनी घटनास्थळी उपस्थित राहुन वाहतुक सुरुळीत केली आहे.

Related Articles

Back to top button