जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । सध्याच्या काळात ऑनलाईन वेबसीरिज आणि अँपवर चित्रपट, मालिका पाहण्याची क्रेझ वाढत चालली आहे. भारतीय प्रेक्षकांना विशेषतः मोबाईल वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी Netflix आणि Disney Plus Hotstar नंतर, Amazon ने देखील एक नवीन प्राइम व्हिडिओ मोबाईल-ओन्ली सबस्क्रिप्शन योजना लाँच केली. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून प्राइम व्हिडिओ अँप (Android) आणि वेबसाइटवर देखील लाइव्ह अनुभवता येणार आहे.
नवीन मोबाईल ओन्ली ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन ही एकासाठीच वार्षिक सबस्क्रिप्शन योजना आहे. केवळ वार्षिक 599 रुपयांत स्टँडर्ड डेफिनिशन (SD) दर्जाचे स्ट्रीमिंग देण्यात येणार आहे. प्राईम सदस्य त्यांच्या मोबाईल फोनवरून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट, Amazon Originals, लाइव्ह क्रिकेट यासह आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड पुरुष क्रिकेट मालिका आणि बरेच काही पाहू शकतील.
सध्या Netflix कडे फक्त मोबाइलसाठी प्लॅन आहे ज्याची किंमत प्रति महिना 149 रुपये आहे. दुसरीकडे डिस्ने प्लस हॉटस्टार, 49 रुपये प्रति महिना आणि 199 सहा महिन्यांसाठी तर 499 रुपये प्रति वर्ष अशी केवळ मोबाइल-योजना आहे. अमेझॉनच्या नवीन प्लॅन व्यतिरिक्त, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अगोदरच तीन सबस्क्रिप्शन प्लॅनच्या ऑफर आहेत. ज्यात मासिक सबस्क्रिप्शनची किंमत रु. 179 आहे, 3 महिन्यांची वैधता असलेला त्रैमासिक प्लॅन रु. 459 मध्ये उपलब्ध आहे आणि वार्षिक योजनेची किंमत रु. 1,499 आहे.
अमेझॉनची नवीन केवळ-मोबाईल योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी, वापरकर्त्यांना फक्त प्राइम व्हिडिओ अँप (Android वर) किंवा PrimeVideo.com वर जाणे आणि सदस्यता घेणे आवश्यक आहे. वार्षिक केवळ 599 रुपये आकारण्यात येणार आहेत.