⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सामाजिक | अजब गजब : मनपा आयुक्त मॅडमांनी तपासले महापौरांचे ‘ब्लडप्रेशर’!

अजब गजब : मनपा आयुक्त मॅडमांनी तपासले महापौरांचे ‘ब्लडप्रेशर’!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरात सध्या दोनच विषय गाजत आहेत, एक म्हणजे खड्ड्यातील रस्ते आणि दुसरे म्हणजे जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग. जळगाव शहर मनपा आयुक्त, महापौर, नगरसेवकांना प्रभागात आणि रस्त्यावरून फिरताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याचदा तर नागरिकांच्या संतापामुळे मनपा प्रशासन विरुद्ध मनपा सदस्य असे चित्र पाहायला मिळते. समस्या सुटत नसल्याने मनपात कुणाचाच रक्तदाब वाढत नसला तरी आज मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी महापौर जयश्री महाजन यांचा रक्तदाब तपासाला. सर्वकाही ठीक असल्याने महापौरांना पुढील उपचाराची आवश्यकता भासली नाही. दरम्यान, जळगावकर नागरिकांना खराब रस्ते, गटारी आणि अस्वच्छतेमुळे मोठ्याप्रमाणात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी तपासणी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मनपा जळगाव अंतर्गत शहरातील बचत गटाच्या महिलांसाठी महिला मेळावा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदरच्या शिबिरामध्ये महिलांना मार्गदर्शन महापौर जयश्री महाजन यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सांगितले कि, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदान व देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक अशा महिलांनी लढा दिला व स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शाम गोसावी अतिरिक्त आयुक्त, चंद्रकांत वानखेडे मुख्य लेखा अधिकारी, अभिजित बाविस्कर उपायुक्त कार्यक्रमास यांची उपस्थिती होती.

शिबिरामध्ये RL हॉस्पिटल जळगाव यांच्याकडील डॉ. अजय हरदास. डॉ. सुरज भूतळा, डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. निशांत पाटील, डॉ.प्रेषित बालसाने यांनी महिलांच्या विविध आजाराची तपासणी व कॉन्सालींग मोफत केले. त्यामध्ये शुगर तपासणी उच्च रक्तदाय तपासणी, ईसीजी तपासणी, महिलांचे पाळी संबंधित आजार इत्यादी. तपासण्या करण्यात आल्या सदर तपासणी मध्ये 170 महिलांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जोशी यांनी केले.

समुदाय संघटक यांनी केले प्रास्ताविक गायत्री पाटील व्यवस्थापक यांनी केले आभार शालिग्राम लहासे व्यवस्थापक यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अश्वास तडवी, राहुल बडगुजर, अमोल भालेराव, राजेश गडकर, आशा चौधरी, कविता जाधव, शीतल कंखरे, भाऊलाल ठाकरे, हिरामण सपकाळे यांनी परिश्रम

author avatar
टीम जळगाव लाईव्ह