जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, कृ.उ.बा स. प्रशासक तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश सचिव रिता बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम, शेतकीसंघ प्रशासक संजय पाटील, प.स. सदस्य निवृत्ती बागुल, रणजीत पाटील, इम्रान खाटीक, गोविंदा बाविस्कर, निनाद शिसोदे, भूषण भदाणे, राहुल गोत्राळ, सनी गायकवाड, सुनिल शिंपी, उमेश सोनार, कृष्णा बोरसे, बाळू पाटील व प्रमुख पदाधिकारी, प्रशासक सदस्य, सरपंच, उप सरपंच उपस्थित होते.