⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरला उद्या ७ ठिकाणी लागणार रक्तदानाचे कॅम्प

अमळनेरला उद्या ७ ठिकाणी लागणार रक्तदानाचे कॅम्प

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रक्तदान अमृत महोत्सवात सहभागी व्हा,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे आवाहन!

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद अमळनेर आयोजित महारक्तदान शिबिर उद्या दि. 17 सप्टेंबर रोजी पार पडत असून यासाठी शहरात वेगवेगळ्या 7 ठिकाणी रक्तदानाचे कॅम्प लावण्यात येणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ अमळनेर,लायन्स क्लब ऑफ अमळनेर,जैन सोशल ग्रुप,अमळनेर, सकल जैन समाज नवयुवक मंडळ,अमळनेर,प्रफुल्ल कॉमर्स क्लासेस अमळनेर,एच.डी.एफ.सी.बँक अमळनेर ,श्री स्वामीनारायण मंदिर संस्था ,राष्ट्रीय सेवा केंद्र नगर परिषद अमळनेर, मुंदड़ा फाउंडेशन, खानदेश शिक्षण मंडळ व धनदाई महाविद्यालय आणि इतर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हे मेगा ब्लड डोनेशन ड्राइव तथा महारक्तदान शिबिर आयोजित केले असून यानिमित्ताने प्रथमच 1008 बॅग रक्त संकलनाचे उद्दिष्ट असल्याने अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने देखील या महा शिबिरास आपले समर्थन दिले आहे.

येथे असेल शिबिर
तेरापंथ भवन अर्बन बँक मांगे अमळनेर,रोटरी हॉल,पिबीए स्कुल जवळ अमलनेर,टाउन हॉल अमलनेर, स्वामीनारायण मंदिर अमलनेर,प्रताप महाविद्यालय अमलनेर, मुंदडाफाउंडेशन मुंदड़ा नगर गलवाड़े रोड अमलनेर, धनदाई महाविद्यालय ढेकु रोड अमलनेर

अमलनेर येथे वरील 7 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.तरी आज दि 17 रोजी सकाळी 8 पासून ते दुपारी 4 पर्यंत वरील कॅम्प स्थळी भेट देऊन जरूर रक्तदान करा असे आवाहन आयोजकांसह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे समर्थन देताना अध्यक्ष चेतन राजपुत तसेच जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले,संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,जितेंद्र ठाकूर,उमेश काटे,जयेश काटे,महेंद्र पाटील,उमेश धनराळे,मुन्ना शेख,आर जे पाटील,राहूल पाटील,जयंत वानखेडे,कमलेश वानखेडे,समाधान मैराळे,सुरेश कांबळे,अजय भामरे यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह