जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या गाड्यांवर तुम्ही अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिराचे स्टिकर पाहिले असतील. मात्र या स्टिकर मागील कारण अनेकांना अद्यापही माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला थोडक्यात याबाबत सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत.
अमळनेरचं मंगळ ग्रह मंदिर हे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह सह देशभरात प्रसिद्ध आहे. श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचे बोलले जाते. मात्र, मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली, या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मंगळ ग्रहाच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे मंदिर विशेषतः प्रसिद्ध आहे.
खरंतर मुलामुलीच्या पत्रिका गुरुजीला दाखवल्या जातात. तेव्हा चुकून मुलीच्या पत्रिकेत मंगळ असला की वरपक्षाकडून अनेकदा लग्नाला नकार दिला जातो. यासाठी लोकं पहिली धाव घेतात ते अमळनेरच्या मंगलदेव मंदिरात. लोक वेगवेगळ्या पूजा करून मंगळाला शांत करण्यासाठी लगेच प्रयत्न सुरु होतात. दर मंगळवारी तर या मंदिरात जणू जत्राच भरते. मंगळाच्या पूजेबरोबरच वेगवगेळ्या विधी केल्या जातात. निव्वळ जळगावच नाही तर खानदेश आणि महाराष्ट्रातल्या वेगवगेळ्या भागातून सुद्धा अनेक लोक या मंदिरात पूजेसाठी येतात.
तर आता बोलायचं झालं तर अनेक गाड्यांवर मंगळ ग्रह मंदिराचे स्टिकर लावलेले दिसतात. तर स्टिकर लावणे ही लोकांची श्रद्धा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. हे स्टिकर न केवळ मंदिराची ओळख देतात, तर ते वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित प्रवासाची आशा देतात. यामुळे जळगावातील वाहनांवर अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिराच्या स्टिकरने शोभून दिसता