---Advertisement---
अमळनेर गुन्हे

कुरीयरने मागवली तलवार : पोलीसांनी उघडकीस आणला प्रकार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात पिता-पूत्राने चक्क कुरीयरनेच तलवार मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमळनेर पोलिसांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिता पुत्राला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

amalner crime talvar jpg webp webp

अमळनेर शहरातील एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे यांनी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावलल्यानंतर दोन वाजेच्या सुमारास स्टेशन रोडकडून मोटरसायकल (क्रमांक एम.एच.15 जी.क्यू.5904) वर संशयित अदनान सादीक खाटीक (19, रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे, गांधलीपुरा) हा पांढर्‍या गोणीत झाकून तलवार आणताना आढळल्याने त्यास ताब्यात घेतले.

---Advertisement---

संशयिताने वडील सादीक सुपडू खाटीक (47) यांच्या नावाने तलवार मागवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. संशयितांची दुचाकीसह भ्रमणध्वनी मिळून एकूण एक लाख 12 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---