जळगाव लाईव्ह न्यूज । माजी विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा सांगत त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव शेअर करत यशाचा मंत्र देत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अल्युम्नी मीट उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी अल्युम्नी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. के. एम. महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत करून अल्युम्नी मीटचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. फालक, अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे, निबंधक डॉ. ईश्वर जाधव, तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकवृंद उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीविषयी माहिती दिली आणि माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी कायम जोडले राहून महाविद्यालयाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. डॉ. वानखेडे यांनी उद्योगातील सध्याचे नवीन तंत्रज्ञान आणि नोकरीच्या संधी यावर माहितीपूर्ण संवाद साधला.माजी विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा सांगत त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव शेअर केले.
काहींनी स्टार्टअप्स आणि उद्योजकतेबाबत माहिती दिली, तर काहींनी त्यांच्या क्षेत्रातील नवे बदल आणि संधी यावर मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षणाचा त्यांच्या यशात कसा महत्त्वाचा वाटा आहे, कार्यक्रमाचे नियोजन अल्युम्नी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. किशोर महाजन यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. रेश्मा अत्तरदे यांनी केले.