⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

अल्टो कार व लक्झरी बसचा भीषण अपघात; चाळीसगावच्या तिघांचा मृत्यू, दोन गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । बुलढाण्यातील मेहकर शहरानजीक अल्टो कार व लक्झरी बसच्या झालेल्या भीषण अपघातात तिन जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर महामार्गावर मेहकर शहरानजीक हा अपघात झाला.

या अपघातात इंदल चव्हाण (38), योगेश विसपुते (32), विशाल विसपुते (38) यांचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.

गंभीर जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की धडक होताच कार ही लक्झरी बसमध्ये अडकली. कारमधील जखमींना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्याने तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन्ही गंभीर जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे.

चाळीसगावचे रहिवाशी

मिळालेल्या माहितीनुसार कारमधील पाच जण हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील आहेत. लक्झरी बस पुण्याहून नागपूरकडे जात होती तर कार नागपूरकडून मेहकरकडे येत असताना भल्या पहाटे हा अपघात घडला. अपघातानंतर तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत पोहोचवली.