⁠ 

आधीच कापसाला नाही भाव : त्यात चोरांचा सुळसुळाट

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात शेजाऱ्यांच्या कापसाला भाव मिळेनासा झाला आहे. त्यातच आता कापूस चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. (COTTON THEFT IN JALGAON)

जामनेर तालुक्यातील पहूर जवळील वाकोद गावातील रहिवासी असलेल्या शेतकर्‍याच्या गोठ्यातून चोरट्यानीं सुमारे 78 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.(THEFT OF COTTON IN JALGAON)

रवींद्र भगवान भगत (31, वाकोद, ता.जामनेर) हे शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाकोद ते तोंडापूर रस्त्यावर शेत असून या शेतात त्यांनी कापूस लावला असून कापूसाची वेचणी करून शेतातील गोठ्यात 13 ते 15 क्विंटल वजनाचा कापूस भाववाढीच्या आशेने साठवून ठेवला होता मात्र गुरुवार, 2 फेब्रुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा दरवाजा तोडून आत ठेवलेला 78 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी रवींद्र भगत यांनी पहूर पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष पाटील करीत आहे.