महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंच्या सर्वच मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार

नोव्हेंबर 18, 2025 3:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असताना येत्या ३ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी महायुतीनेही कंबर कसली असताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे.

mantralay shinde gat

तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी थेट बहिष्काराचं अस्त्र उगारलं आहे. शिंदेंच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

काय आहे प्रकार?

आज (18 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीला सामान्यत: सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित असतात. परंतु आजच्या बैठकीला शिंदेंचे सर्वच मंत्री अनुपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्यामळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, भाजपात होणारे पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये निधीवाटपावरून प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे.  त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now