⁠ 
रविवार, मे 19, 2024

महासभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बाबत काहीही काम होत नाही, मनपा अधिकाऱ्यांच्या आर्थिक सहकार्य घेतले जात आहे. जर वारंवार चुका होत असतील तर आपल्यासारखा ढ कोणी राहणार नाही. आम्हाला वेडे बनवण्याचा कार्यक्रम बंद करावा अश्या शब्दात नगरसेवक चंद्रशेखर पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शहर अभियंता एम जी गिरगावकर हे मक्तेदार कडून पैसै घेत असल्याचा आरोप कैलास सोनवणे यांनी केला. गिरगावकर यांना समज द्या, टक्केवारी घेतली जात आहे. मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांचा वचक राहिलेला नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी भाजप नगरसेवकांनी महासभा तहकूब करण्याची मागणी केली.

नगरसेवक नितीन बर्डे यांनी देखील प्रशासनाला धारेवर धरत मोठे आरोप केले. यावेळी बर्डे म्हणाले कि, नळ कनेक्शन द्यायला १ हजार रुपये घेतले जातात. छोटे छोटे काम महिनो महिने केले जात नाहीय, रस्त्यांची कामे केली जात नाहीय, मनपातील प्रत्येक टेबलावर टक्केवारी घेतली जात आहे. समता नगर ते धांडे नगर सहा महिन्या च्या आत काम केली जात नाहीय, जय नगर, रामदास कॉलनी दरम्यान नळ कनेक्शन दिलं जात नसल्याने रस्त्यांची कामे थांबल्याचा आरोप यांनी केला. पुढेच नगरसेवक तथा शिवसेना गटनेते बंटी जोशी यांनी देखील आता आमचा अंत पाहू नका म्हणत आपला रोष व्यक्त केला. पुढे मनपा फंडातून मक्तेदार काम करायला तयार नाहीत. आम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत, मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा फटका आम्हाला बसत असल्याचा आरोप मनोज चौधरी यांनी केला.

.जळगाव महापालिकेची महासभा आज सोमवारी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

गेल्या महिन्याभरापूर्वी महापौरांनी रस्ते दुरुस्ती करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अजूनही रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने भाजप नगरसेविका उज्वला बेंडाळे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याने आम्हाला शिव्या खाव्या लागतात. आता रस्ते दुरुस्त केव्हा होतील हे मनपाने सांगावे, अन्यथा आम्ही महासभा चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शहरातील एखादा रस्ता खड्डे मुक्त नाही असे दाखवून द्या, असे आव्हान शुचिता हाडा यांनी आयुक्त विद्या गायकवाड यांना दिले. दरम्यान संतप्त नगरसेवक दिलीप पोकळे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांना अधिकाऱ्यांचे नाव द्यावे असा टोलाही आयुक्तांना लगावला. तर मक्तेदार यांना बोलावून घ्यावे, त्यांना जाब विचारावा, आणि महासभेने मक्तेदाराला कळ्या यादीत टाकाण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य नितिन लढ्ढा यांनी केली. रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन जितेंद्र मराठे यांनी विरोधी पक्षनेते रस्त्यावर का उतरत नाहीत? असा प्रश्न उपस्थीत करीत शिवसेनेची कोंडी केली. शिवाजी नगर उड्डाण पुलाचे डांबरी करण केले जात आहे मग रस्त्यांचे का नाही? असा सवाल आश्विन सोनवणे यांनी केला