जळगावमार्गे आणखी एक अमृत भारत एक्सप्रेस धावणार; कुठून कुठपर्यंत असणार?

जानेवारी 24, 2026 1:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव आणि भुसावळ मार्गे आणखी एक नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस (DN-11031/ UP-11032) ट्रेन सुरु करण्यात आली आहे. या गाडीला जळगाव-भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

amrut bharat train

ट्रेन क्रमांक 11031 पनवेल जंक्शन-अलीपुरद्वार जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11:50 मिनिटांनी पनवेल जंक्शनवरून सुटेल आणि बुधवारी दुपारी 01:50 मिनिटांनी वाजता अलीपुरद्वार जंक्शन स्टेशनवर पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक 11032 अलीपुरद्वार जंक्शन- पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 04:45 वाजता अलीपुरद्वार जंक्शनवरून सुटेल आणि शनिवारी पहाटे 05:30 वाजता पनवेल जंक्शन स्टेशनवर पोहोचेल.

या स्थानकांवर थांबणार?
कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now