⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | Alert : भोंगेप्रश्नी पोलीस विभाग सतर्क, मश्चिद ट्रस्ट, मौलवींची घेतली बैठक

Alert : भोंगेप्रश्नी पोलीस विभाग सतर्क, मश्चिद ट्रस्ट, मौलवींची घेतली बैठक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गृह विभागाने पाेलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने चाळीसगाव शहर पाेलिसही अलर्ट झाले असून २० राेजी शहरातील मशिदींचे माैलवी तसेच ट्रस्टींची बैठक पाेलिसांकडून घेण्यात आली. यात सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला.

यांची उपस्थिती

शहर पाेलिस ठाण्यात सकाळी झालेल्या या बैठकीस डीवायएसपी कैलास गावडे, पाेलिस निरीक्षक के. के. पाटील तसेच शहरातील सर्व मशिदींचे माैलवी, ट्रस्टी व मुस्लीम बांधव उपस्थित हाेते. दरम्यान, सर्व नियमांचे पालन करू, प्रशासनास सर्वताेपतरी सहकार्य करू, असे आश्वासन बैठकीत उपस्थितांनी दिले. दर्गाह ट्रस्ट, जामा मशिद, जमील रहेमान मुजावर, अकील मुजावर, रफिक मुजावर, लाला मुजावर, गफूर पहिलवान, उस्मान मौलाना, मदिना मशीद मौलाना आदींसह अन्य समाजबांधव उपस्थित हाेते.

काेर्टाच्या तत्त्वांचे पालन करा

बैठकीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाउडस्पीकर वाजवण्यास मनाई असल्याची सूचना डीवायएसपी कैलास गावडे यांनी केली. त्यामुळे या वेळेत मशिद, मंदिर तसेच कुठल्याही धार्मिक स्थळावर भाेंगा अथवा लाउडस्पीकर लावू नये, असे अावाहन त्यांनी केले. तसेच दिवसा सकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान कुठलेही धार्मिक स्थळ, लग्न समारंभ, कीर्तन, सप्ताह अशा ठिकाणी लाउडस्पीकर लावायचा असल्यास अगाेदर परवानगी घ्यावी. परवानगी घेवूनच लाउडस्पीकर लावावे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे व कायद्याचे पालन करावे. उल्लंघन केल्यास पाेलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.

शहर आपले, शांतता ठेवण्याची जबाबदारी आपली

काेविडच्या दाेन वर्षांनंतर शहराचे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सर्वांनी कायद्याचे भान ठेवावे. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेविषयी कुठलीही तडजाेड केली जाणार नाही. पाेलिस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून प्रत्येक कठीण परिस्थितीला ताेंड देण्यास सज्ज आहे. शहर आपले आहे, त्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, हे लक्षात ठेवून सहकार्य करावे, अशी अपेक्षाही पाेलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी व्यक्त केली.
मार्गदर्शन करताना कैलास गावडे. साेबत के. के. पाटील व पदाधिकारी.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह