अरेरे..तीन अल्पवयीन मुलीस पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । पाचोरा तालुक्यातील विविध ठिकाणी हुन तब्बल तीन अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचे प्रकार समोर आला आहे. यामुळे अल्पवयीन मुलींच्या कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत विविध पोलिसांत अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमांनी पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

crime 2 jpg webp

तिन्ही घटना या पाचोऱ्या तालुक्यात घडल्याय. त्यात पहिली घटना ही तालुक्यातील अंतर्ली येथे घडली असून तक्रारीत म्हटले आहे की, अंतर्ली येथे वास्तव्यास असलेली १७ वर्ष ४ महिने १० दिवसांची अल्पवयीन मुलीस कुणी अज्ञात इसमाने काही तरी आमिष देऊन फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. याबाबत दि.२३ रोजी पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यानुसार भा.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात इसमांविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास प्रकाश पाटील करत आहे.

तर दुसरी घटना ही तालुक्यातील नाचखेडा येथे घडली असून तक्रारीत म्हटले आहे की, नाचखेडा येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या १६ वर्ष ६ महिन्याच्या अल्पवयीन मुलीस कुणी तरी अज्ञात इसमाने काही तरी आमिष देऊन पळवून नेल्याचे म्हटले आहे. याबाबत दि.२३ रोजी पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यानुसार भा.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास निवृत्ती मोरे करत आहे.

तिसरी घटना तालुक्यातील शिंदाड येथे घडली असून पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारी नुसार येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या १७ वर्ष ११ महिने असलेल्या अल्पवयीन मुलीस कुणी तरी अज्ञात इसमाने काही तरी आमिष देऊन पळवून नेले. याबाबत दि.२३ रोजी पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यानुसार भा. ३६३ प्रमाणे अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास किरण ब्राह्मणे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now