बातम्या

पुण्याच्या स्विमिंग स्पर्धेत जळगाव पोलीस टँकच्या ‘अक्षराची’ बाजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे नुकतीच निवड स्पर्धा संपन्न झाली. यात जळगाव ची स्पर्धक अक्षरा योगेश वराडे हिने 50 मी फ्री स्टाईल स्विमिंग व 50 मी ब्रेस्टस्ट्रोक स्विमिंग प्रकारात तिसरा क्र. मिळविले. त्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी कैातुक केले.

दि. ३ ते ४ रोजी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली. राष्ट्रीय स्थरावर होणाऱ्या स्पर्धा मध्ये प्रवेश करिता स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड स्पर्धेंमध्ये 50 मी फ्री स्टाईल स्विमिंग व 50 मी ब्रेस्टस्ट्रोक स्विमिंग प्रकारात पोलीस स्विमिंग पूल व ओरीओन इंग्लिश मेडियम स्कूल जळगाव ची स्पर्धक अक्षरा योगेश वराडे हिने तिसरा क्र. मिळविले. स्पर्धे करिता कोच म्हणून कमलेश नगरकर पोलीस स्विमिंग पूल यांचे मार्गदशन लाभले.

Related Articles

Back to top button