⁠ 
रविवार, मे 19, 2024

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रेकॉर्ड, वर्षानुवर्षे ‘हे’ रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाही..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

क्रिकेट हा एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये अनेक वेळा बनवलेले आणि तुटलेले अनेक विक्रम पाहिले असतील, पण क्रिकेट जगतात असे काही विचित्र रेकॉर्ड्स आहेत जे फार कमी लोकांना माहीत आहेत. वर्षानुवर्षे हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही. त्यामध्ये असे काही तथ्य देखील आहेत जे तुम्ही याआधी कधीच वाचले नसतील, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल.

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. गेलने 2012 मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती.

कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सर्वाधिक बाद होण्याचा विक्रम भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनील गावसकर कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ३ वेळा बाद झाले आहेत. आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावरही न ऐकलेला विक्रम आहे. सौरव गांगुली हा क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग चार वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. 1997 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने सलग 4 सामनावीर पुरस्कार जिंकला.

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने 1996 मध्ये 37 चेंडूत 11 षटकार आणि 6 चौकार मारून त्यावेळी सर्वात जलद शतकाचा विश्वविक्रम केला होता. पण तुम्हाला माहित आहे का की या मॅचमध्ये आफ्रिदीने सचिन तेंडुलकरच्या बॅटचा वापर केला होता. खरंतर आफ्रिदीकडे योग्य बॅट नव्हती, म्हणून वकार युनूसने त्याला सचिनची बॅट खेळायला दिली.

इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकरने कसोटी सामन्यात 19 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. हा विक्रम आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला मोडता आलेला नाही. कसोटी सामन्यात बनवलेला हा क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम आहे. जिम लेकरने या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्या.