⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

35 वर्षानंतर ‘परिवर्तन’ मतदारांनी परिवर्तन पॅनलला दिला कौल

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे तब्बल 35 वर्षानंतर परिवर्तन पँनलने विजय मिळवला आहे. यांनी 13 पैकी 11 जागांवर विजय मिळवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी शनैश्वर पॅनलला फक्त दोन जागा मिळाल्या.या निकालामुळे निवडणुकीत ३५ वर्षांनी परिवर्तन झाले आहे.


श्रीकांत पाटील व भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली परीवर्तन पॅनल स्थापन होऊन 35 वर्षांनंतर सहकारच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. या निवडणुकीत परीवर्तनचे सर्वसाधारण जागेत विनोद भगवान पाटील (315), अरुण विश्वास पाटील (305), जयप्रकाश रामदास पाटील (301), राजेंद्र श्रीराम पाटील(294), कैलास तुकाराम पाटील (282) ,रणछोड झाम्बर पाटील (282), महिला मतदार संघ- मंगलाबाई भास्कर पाटील (377), सिंधुबाई गुलाब पाटील (301), अनुसूचित जाती जमाती मतदार संघ – अरुण नामदेव घोलप (317), नागरिकांचा मागास प्रवर्ग – विश्वास अभिमन (329), भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग – दिलीप नामदेव गढरी(353) यांनी विजय मिळवला. परीवर्तनच्या विजयासाठी दीपक बागुल, राकेश पाटील, जे.व्ही.बागुल, बापू मोतीराम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिस्पर्धी पॅनलचे भाईदास नवल पाटील (305) व अनिल प्रकाश पाटील(287) हे दोनच उमेदवार विजयी झाले. एकूण 657 पैकी 626 मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी व्ही.एम.जगताप यांनी काम पाहिले. त्यांना सचिव निरंक पाटील व रवींद्र पाटील यांनी सहकार्य केले.