नशिराबादला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीपारायण सोहळा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । नशिराबाद येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीपारायण सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी सर्व कीर्तनकार यांनी समाज प्रबोधन करून कीर्तनात सर्व भाविकांनी मनसोक्त कीर्तनाचा आनंद लुटला.

सप्ताह ची सुरूवात विठोबा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताह सांगते च्या पालखी सोहळ्यात सर्व भाविकांनी भजन म्हणून सहभाग नोंदविला. या दिंडी सोहळ्यात सर्वांनी वारकरी वेशभूषा करून टाळ, भजन, मृदंगाच्या गजरात सर्व परिसर भक्तिमय करण्यात आला होता. या सोहळ्यास कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील माजी सरपंच विकास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तर सोहळ्यात , माजी सरपंच पंकज महाजन, नशिराबाद शिक्षण मंडळ चे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण, तर श्री हभप सुनिल शास्त्री महाराज, प्रभाकर महाराज, पंकज महाराज, प्रमोद महाराज, सुजित महाराज, रमेश पाटील, सुरेश माळी, संजय महाराज, आबा पाटील, अशोक माळी, महेश माळी, मधूकर महाजन,सुनील माळी, संदीप जगताप, सोपान माळी, संतोष पवार, भास्कर पाटील, हेमराज महाजन, नामदेव माळी जगन पाटील पंढरीनाथ पाटील संतोष पवार गणेश पाटील , पिंटू पवार व सर्व समाज बांधवांनी व सर्व स्त्री भाविकांनी हातात टाळ घेऊन सहभाग नोंदवून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.

काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र सांगून काल्याच्या महत्व श्री हभप सुनिल शास्त्री महाराज नशिराबादकर यांनी पटवून दिले. या कार्यक्रमाचे सर्व मार्गदर्शन श्री हभप सुनिल शास्त्री महाराज यांनी केले. या कार्यक्रमास सर्व सभासद व सर्व समाज बांधव यांनी सहकार्य केले.