जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सांगितले होते की, मला पक्षामध्ये जबाबदारी हवी आहे. मला विरोधी पक्षनेता पदावरून मुक्त करा.
यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याची चर्चा रंगू लागली आहे. जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून लवकरच त्यांच्या जागी हे पद अजित पवार यांना मिळेल असे म्हटले जात आहे.राष्ट्रवादीचे कित्येक आमदार अजित पवार यांना प्रचारध्यक्ष पद द्या असे म्हणत असून यासाठी लॉबिंग ही करत असल्याचे म्हटले जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र पक्षाच्या घटनेनुसार एक व्यक्ती एका पदावर तीन वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. यामुळे आता त्यांचे पद बदलू शकते आणि ते अजित पवार यांना मिळू शकते असं म्हटलं जात आहे.