⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | खामखेड्याला केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा

खामखेड्याला केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktinagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे दि. रविवारी रोजी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यातक्षम केळी व CMV व्हायरस संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभगाच्या योजनांविषयी, केळी उत्पादन तंत्र,बड इंजेक्शन व सर्टिंग बॅग च्या वापराचे प्रात्यक्षिक अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

देसाई फ्रूट एक्सपोर्ट कंपनी चे प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्र व निर्यातीचे निकष शेतकऱ्यांना सांगितले व बड इंजेक्शन व सर्टिंग बॅग च्या वापराचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. महेश महाजन यांनी CMV व्हायरस नियंत्रणा बाबत व धीरज नेहेते यांनी केळी पिकावरील जिवाणू व विषाणू जन्य रोगाबाबत सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी शेतकऱ्यांना PMFME, GI मानांकन, होर्टनेट ट्रेसेबिलिटी, PMKISAN E-KYC,कीटकनाशक फवारणी करतांना घवयाची काळजी, असे अनेक कृषी विभगाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.

या वेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, खामखेडा गावचे सरपंच पुंडलिक तायडे, उपसरपंच कृष्णा पाटील, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील, योगेश पाटील, भास्कर पाटील, छोटू पाटील, विनोद पाटील , महेंद्र मोंढाळे, नवनीत पाटील, गोविंदा पाटील, विकास पाटील, प्रशांत पाटील, कैलास पाटील, अतुल चौधरी, मोहन पाटील,भागवत पाटील, अरुण पाटील , निलेश पाटील , लक्ष्मण पाटील , प्रकाश वाघ , सुभाष वाघ, भावजी पाटील, शांताराम गवते , बाळू पाटील, सुभाष वाघ, किरण वाघ , मधुकर कारगुळे, रोहिदास कारगुळे, लक्ष्मण वाघ, मधुकर गवते, अमोल कारगुळे तसेच गावातील सर्व शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह