शिंदे गट आक्रमक : जळगाव मनपातील कारभाराच्या सखोल चौकशीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेतील शिंदे गटातील शहरातील समस्यांबाबत आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत महापौर जयश्री महाजन यांना निवेदन दिले. यामध्ये घनकचरा प्रकल्प, अमृत योजना, वॉटरग्रेस कंपनी, पार्किंग सुविधा व इतर सुविधांबाबत विचारणा केली आहे. व सखोल चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत जळगांव महानगरपालिकेचा कारभार अत्यंत संथ गतीने चाललेला असुन त्यामुळे जळगांवतील जनता त्रस्त आहे. जळगांव शहारातील जनतेस योग्य न्याय मिळवून देणेकरीता आपण सन्मानिय महापौर पिठासीन अधिकारी म्हणुन सभागृहात घनकचरा प्रकल्प, अमृत योजना, वॉटरग्रेस कंपनीच्या निष्काळजी कारभार, अनाधिकृत बेसमेंटवर कारवाई, आकृतीबंध, एलईडी कंपनीच्या थांबलेल्या कामाबाबत सखोल चौकशी करावी.

यावेळी नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक चेतन संकत, कुंदन काळे, गजानन देशमुख