जळगावात पुन्हा विनयभंग ! गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज :६ एप्रिल २०२३ : दुकानात कामाला असलेली तरुणी बाथरूमला गेल्यानंतर एका दुकानात काम करणार्‍या तरुणाने मुलीशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. ही घटना जळगाव शहरातील नवी पेठ भागातील नटवर मल्टीफ्लेक्सच्या परीसरात बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. जळगाव शहर पोलिस स्टेशनला समीर शेख या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विनयभंग करीत ओढले गाल
नटवर मल्टीफ्लेक्सच्या परीसरातील एका व्यापारी संकुलात 20 वर्षीय तरुणी कामाला आहे तर याच भागातील एका दुकानात तरुणदेखील कामाला आहे. तरुणी बुधवारी दुपारी बाथरूममधून बाहेर निघाल्यानंतर तरुणाने तिचे गाल ओढले तसेच या प्रकारानंतर बेसावध तरुणी तोल जावून खाली पडली.

यानंतर तरुणाने पुन्हा तिचा हात धरीत विनयभंग केला. तरुणीच्या फिर्यादीवरून विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत करीत आहेत.