⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राजकारण | पवार भेटीनंतर देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी ; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

पवार भेटीनंतर देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी ; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल मुंबईत भेट घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. दरम्यान, फडणवीसांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव भाजपला गळती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली असल्याचे मानल जात आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड थांबणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे थैमान घातले. यात केळीच्या बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.

दरम्यान, फडणवीस येणार म्हणून खडसे यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी फडणवीस यांनी खडसेंच्या घरात बसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या बांधणीवर रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्याचं समजतेय. तसेच जळगावमध्ये खासकरून रावेर मतदारसंघात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी चर्चा केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.