जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२। मनपा आयुक्त डॉ. सतीश कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
महापालिकेचे आयुक्त निवृत्त होत आहेत. यामुळे त्यांच्या जागेवर कोण येणार याबाबत उत्सुकता लागली होती. या अनुषंगानेे त्यांच्या रिक्त होणार्या पदाची अतिरीक्त जबाबदारी आता मनपाच्या अतिरीक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे देण्यात आली असल्याचे नगरविकास विभागाचे आदेश शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. यामुळे तूर्तास जळगाव शहर महापालिकेला कायमस्वरूपी आयुक्त मिळणार नसून डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे याची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.