⁠ 
सोमवार, मे 20, 2024

वेळेवर व नियमित ऑक्सीजन पुरवठा न केल्यास होणार कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव जिल्हयात कोविड -19 विषाणूमुळे बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने खाजगी कोविड -19 रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना वेळेवर व नियमित मेडीकल ऑक्सीजन पुरवठा होणे आवश्यक आहे.

खाजगी कोविड–19 रुग्णालयांना त्यांचे मागणी व आवश्यकतेनुसार नियमित व तात्काळ मेडीकल ऑक्सीजन पुरवठा केला जात नसलेबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने खाजगी कोविड -19 रुग्णालयांना नियमित व तात्काळ मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात यावा. 

सदर कामात टाळाटाळ व दिरंगाई आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.