जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात मागील सप्ताहात सलग दोन वेळा दडगफेक करून दहशत पसरवण्याच्या प्रयत्न धर्मांधांनी केला होता. एका घटनेत गुन्हा नोंद होऊनही दुसर्या दिवशी पुन्हा दगडफेक करण्याचे धाडस यांचे होतेच कसे ? अकोला, नगर या जिल्ह्यात नुकत्याच दंगली घडलेल्या असतांना अशा घटना घडवून आणून शहरातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहणार्या धर्मांधांवर तसेच या घटनांमागील सूत्रधारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली.

या आंदोलनाला हिंदु राष्ट्र सेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,श्री योग वेदांत समिती, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रणरागिणी शाखा, आदी हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि हिंदु बांधव उपस्थित होते. या वेळी ‘ही दगडफेक नाही जिहाद आहे, देशविरोधी आतंकवाद आहे !’, ‘मंदिरावरील दगडफेकीचे प्रकरण दाबू पाहणार्या पोलीस प्रशासनाचा निषेध असो !’, ‘दगडफेक करणारे हात ७०-८० जणांचे, गुन्हा नोंदवले फक्त २० जणांवर..’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या वेळी आंदोलकांच्या वतीने दोन्ही दगडफेकीच्या घटनेत जे धर्मांध सहभागी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांमागे आणि सम्राट कॉलनी परिसरात दहशत निर्माण करण्यामागे असलेल्या सूत्रधारावरही कारवाई केली जावी अशा मागण्या करण्यात आल्या. यासोबत एमआयडिसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक यांनी दोन्ही प्रकरणात सम्राट कॉलनी परिसरातील महिला आणि पुरूष यांना केसेस दाखल करतो असे सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला तसेच महादेव मंदिरावरील दगडफेकीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे, याबद्दच त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. प्रत्यक्षात १९ मे रोजी मंदिरावर झालेल्या दगडफेकीसंदर्भात जिल्ह्यातील गोपनीय विभागांचे अहवाल तपासल्यास सत्यता आणि गंभीरता लक्षात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
नसलेले हेट स्पीच माथी मारून हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्यांची चौकशी करा !
जळगाव जिल्ह्यात गेली १० वर्षे हिंदूंच्या सभा शांततेत पार पडत आहेत. या सभांच्या माध्यमातून हिंदु समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतांना प्रशासनाला निवेदने देत राहून, त्याला भरमसाठ प्रसिद्धी देऊन हिंदूंच्या सभांवर कारवाई करण्याचा दबाव शासन यंत्रणांवर आणणे, हेच मुळात हेट स्पीच आहे. त्यामुळे अशा निवेदनकर्त्यांचीच चौकशी करावी, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील म्हणाले की, पोलीस प्रधासन धर्माधवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांचा पाठपुरावा घेणार असल्याचे सांगितले, तर हिंदु महासभेचे राज्य आध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी म्हणाले की, हिंदू जनजागृती सभेमध्ये काहीही चुकीचे किंवा असंविधानिक बोलले गेले नसतानाही तथाकठीत धर्माधाच्या दबावणे आयोजकावर गुन्हे दाखल करणे अयोग्य आहे.
याकरिता आम्हालाही न्यायालयात जावे लागू शकते असे त्यांनी सांगितले, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री मोहन तिवारी, देवगिरी प्रांत संयोजक श्री देवेंद्र भावसार, सम्राट नगरातील रहिवासी, पिंटू परदेशी, गणेश चौधरी यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. भाजपच्या माजी महापौर् सौ. सिमा भोळे, याही उपस्थित होत्या. तसेच शेकडो हिंदूधर्म प्रेमी उपस्थित होते.
आयोजक समस्त हिंदुत्ववादी संघटना







