गुन्हेजळगाव जिल्हायावल

यावलात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपरसह चालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनगावकडून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार शरद शिंदे, पोलीस नाईक अल्ताफ अली आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांचे असे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने २१ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास यावल शहराजवळील फॉरेस्ट नाका जवळ नाका-बंदी केली. त्यावेळी किनगावकडून यावलकडे जाणारा डंपर येतांना दिसून आला. त्यात चोरटी वाहतूक करतांना दिसून आले. त्यांची चौकशी केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे (वय-३२) रा. ममुराबाद ता. जि.जळगाव आणि डंपर मालक संदीप आधार साळुंखे रा. कोळन्हावी ता. यावल या दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन चव्हाण करीत आहे.

Related Articles

Back to top button