⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

प्रवाशांना दिलासा! जळगावमार्गे अहमदाबाद-पुरी विशेष एक्स्प्रेस धावणार, कोण-कोणत्या स्थानकांवर असेल थांबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । यंदा उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांची मागणी आणि सुविधा लक्षात घेऊन विशेष गाड्या सातत्याने चालवल्या जात आहेत. अशातच रेल्वे गाड्यांना प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता अहमदाबाद-पुरी विशेष उन्हाळी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. ही रेल्वे जळगाव, भुसावळमार्गे धावणार आहे.

या विशेष एक्स्प्रेसच्या केवळ दोनच फेऱ्या होणार आहेत. ०९४५३ अहमदाबाद- पुरी ही १० मे रोजी अहमदाबाद येथून सायंकाळी ७.१० वाजता सुटणार आहे. तिसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता ती पुरी येथे पोहचेल. दरम्यान, रेल्वे क्रमांक ०९४५४ पुरी-अहमदाबाद-पाळधी विशेष रेल्वे १२ मे रोजी दुपारी ४.३० वाजता पुरीहून सुटेल

या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला वडोदरा, सुरत, उदना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, वर्धा, नागपूर, तुमसर रोड, गोंदिया, दुर्ग, रायपूर, लाखौली, महासमुंद, खरियार रोड, कांताबंजी, टिटीलागड, केसिंगा, मुनीगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोबिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, ब्रह्मपूर, छतरपूर, खुर्दा रोड आणि साक्षीगोपाल स्टेशनवर थांबा असेल .