⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

महिलेचा विनयभंगप्रकरणी आरोपीस एक महिन्याचा सश्रम कारावास

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला एक महिन्याचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने शनिवारी ठोठाविली आहे. उमर शाह रोशन शाह असे संशयित आरोपीचे नाव आहे. जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. मुगळीकर यांनी हा निकाल दिला.

सविस्तर घटना अशी की, आरोपीने फिर्यादी एकटी घरी असतांना फिर्यादीच्या घरात घुसून वाईट हेतूने तिचा हात पकडला आणि तिला स्वतः च्या अंगावर ओढले. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर तिचे पती घटनास्थळी आला. त्याने आरोपीच्या कृत्याबद्दल आरोपीला जाब विचारला असता त्याने फिर्यादीच्या पतीस धमकी देऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीच्या पतीने व शेजारच्या लोकांनी आरोपीस पकडून थेट पोलिसांत आणले होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. दोषारोप दाखल झाल्यानंतर न्यायाधीश व्ही. व्ही. मुंगळीकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने उमर शाह याला दोषी धरून शिक्षा ठोठावली. खटल्याकामी पैरवी अधिकारी राजेश भावसार व सरकार पक्षातर्फे ऍड.रंजना पाटील यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :