खुशखबर! तीन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या धावणार ; भुसावळ, जळगाव येथे असेल थांबा
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२४ । रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रशासनाकडून दादर गोरखपूर, एलटीटी – गोरखपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – दानापूर दरम्यान अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांच्या १२ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना भुसावळ, जळगाव येथे थांबा आहे.
उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून या गाड्या धावतील, त्यात दादर गोरखपुर गाडीच्या ६ फेऱ्या होतील. ०१०१५ क्रमांकाची गाडी २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. या गाडीच्या तीन फेऱ्या होतील, तर ०१०१६ क्रमांकाची गाडी गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ व ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी येथे थांबा आहे
मुंबई -दानापूर गाडीच्या दोन फेऱ्या
०१०५१ ही अनारक्षित विशेष गाडी २८ एप्रिलला रात्री ११.२० वाजता मुंबईहून सुटून तिसऱ्या दिवशी दानापूरला पोहोचेल. या गाडीची एकच फेरी असेल. ०९०५२ अनारक्षित विशेष गाडी ३० एप्रिलला दुपारी १.३० वाजता दानापूरहून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबईत पोहोचेल. ही गाडी विभागात नाशिक रोड, मनमाड, भुसावळ येथे थांबेल.
एलटीटी – गोरखपूर विशेषच्या चार फेऱ्या एलटीटी –
गोरखपूर या गाडीच्या चार फेऱ्या होतील. ०१४२७ गाडी एलटीटी येथून २६ एप्रिलला धावली. आता १ मे रोजी रात्री ११.५० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. ०१४२८ गाडी २८ एप्रिल, ३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुरहून सुटेल. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा येथे थांबा आहे.