पाळधी येथे प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पलटली ; ५ जण जखमी

एप्रिल 27, 2024 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून खासगी बसला अपघात झाल्याची घटना समोर आली. अचानक टायर फुटल्याने सुरत येथून अकोल्याकडे जाणारी खाजगी बस पलटी झाल्याची घटना आज २७ रोजी सकाळी घडली. या अपघातात ५ जण जखमी झाले असून घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धाव घेऊन जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

paldhi bus accident jpg webp

याबाबत असे की, सुरत येथून अकोला जाण्यासाठी निघालेल्या खाजगी आराम बसचे आज शनिवारी सकाळी पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात अचानक तयार फुटले. यानंतर बस पलटी झाली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. गावातच रहिवासी असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बस बाहेर काढून त्यांनी रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी रवाना केले.

पाळधी दुरक्षेत्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेमध्ये विद्या सागर निगडे (वय ४०), सोनू अंकुश मिस्तरी (वय २७), कौतिक सुपडा गवळी (वय ५०), आशाबाई सुभाष भोसले (वय ४५, सर्व रा. सुरत) यांच्यासह १२ वर्षीय अर्चना स्वामी निकडे (रा. काठोध जि.बुलढाणा) पठाण गफार खान (वय ४०, रा. सुरत) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now