⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

बहिणीची भेट राहिली अधुरी, एकुलत्या भावाचा अपघाती मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । नाशिकचे सासर असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या भावाचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली होती. गोपाळ ज्ञानेश्वर चौधरी (वय २३, रा. तावसे, ता. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अखेर कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे घटना?
गोपाळची बहिण दीपाली गजानन पाटील यांचे सासर आव्हाणे येथील आहे. त्या सध्या नाशिक येथे स्थायिक झाल्या आहेत. आव्हाणे येथे १९ फेब्रुवारी रोजी नोतवाइकांकडे लग्न असल्याने दीपाली पतीसह आल्या होत्या. बहिणीची भेट घेण्यासाठी गाेपाळ तावसे येथून दुचाकीने (एमएच १९ एएफ ००३७) येत होता. जळगाव तालुक्यातील हातेड नाला परिसरात पाठीमागून येणाऱ्या एका कारने गोपाळच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

अपघातात गोपाळ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोपान सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रविवारी अज्ञात कारचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सतिश हळणोर तपास करीत आहेत.

दोन बहिणींचा एकुलता भाऊ, कुटंुबीयांना धक्का
गोपाळ अविवाहित होता. दोन विवाहित बहिणींचा तो एकुलता भाऊ होता. शेतीकाम करुन तो उदरनिर्वाह करीत होता. दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने कुटंुबीयांना प्रचंड धक्का बसला. त्याच्या पश्चात वडील, आई, असा परीवार आहे.

हे देखील वाचा :