ACCIDENT : भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

ACCIDENT 13 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चाळीसगाव- कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ घडली.

याबाबत वृत्त असे की, नामदेव गोबरू राठोड (वय- ६२) रा. मुंदखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.२० सीएल १६०४) वैयक्तिक कामानिमित्त चाळीसगावला आले होते. काम आटोपून घरी परतताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एम.एच. १७ एझेड ९०१९) जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात नामदेव गोबरू राठोड (वय- ६२) यांच्यासह एका विवाहितेला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचाराकामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांची प्राणज्योत मावळली. हि थरारक घटना सोमवार, १६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चाळीसगाव- कन्नड रोडवरील सहयोग हॉटेलसमोर घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सोबतच्या मृत विवाहित महिलेची ओळख सायंकाळी पर्यंत पटलेली नव्हती.

तत्पूर्वी राठोड यांची सासरवाडी तालुक्यातील लोणजे येथील आहे. यामुळे सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी ते आले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत नोंद करणे सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now