---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगावात अपघाताचे सत्र थांबेना ! ट्रकने तरुणाला चिरडले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून याच दरम्यान आणखी एका अपघाताची बातमी समोर आलीय. भरधाव अज्ञात ट्रकच्या धडकेत भुसावळचा दुचाकीस्वार तरुण ठार झाला. ही घटना जळगावच्या खेडी फाट्याजवळ घडली असून महेंद्र एकनाथ बोंडे (वय ३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) असे मृताचे नाव आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

या घटनेबाबत असे की, भुसावळ शहरातील गणेश कॉलनी आई-वडिलांसह राहणारे महेंद्र बोंडे हे जळगाव एमआयडीसीतील गणेश अल्युमिनियम कंपनीत काम करत होते. दररोज भुसावळ ते जळगाव असा दुचाकीने प्रवास करत असत. शनिवारी (इि.२९) सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना खेडी फाट्याजवळ अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

---Advertisement---

यात ते रस्त्यावर पडले आणि ट्रकने त्यांना चिरडले. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment