Accident : दर्शनासाठी निघालेल्या अकुलखेडा येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

एप्रिल 10, 2022 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या चोपडा येथील तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात शनिवारी रात्री १० वाजता घडला. या प्रकरणी चोपडा येथील पोलिसांत उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

accident 7 1 jpg webp

अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथून तीन ते चार मित्र वेगवेगळ्या दुचाकीने ९ रोजी रात्री १० वाजता सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी निघाले हाेते. दरम्यान, अकुलखेडा येथील संदीप बाळू पाटील (वय ३८) हे देखील दुचाकीने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. अपघाताचे वृत्त उपसरपंच योगेश पाटील यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात ही माहिती कळवली आणि त्यानंतर संदीपला उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांना मृत घोषित केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत संदीप पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now