Accident : पाळधीजवळ भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले, एक जागीच ठार

ऑक्टोबर 22, 2022 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवल्याने 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाळधीजवळ घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

accident 34 jpg webp

जळगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी असलेले संजय ढोमण सपकाळे (40) हे शनिवार, 15 रोजी दुपारी जळगावकडून पाळधी येथे दुचाकी (क्र. एम.एच.19.सी.एच.4726) ने जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सूर्याजवळ मागून येणार्‍या चारचाकी (क्र.एम.एच.20.एफ.यु.6453) ने धडक दिल्याने संजय सपकाळे यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुरुवार, 20 रोजी सनी संजय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चारचाकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गजानन महाजन करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now