अरे बापरे : या ठिकाणी उधळला तब्बल २० हजार गोणी गुलाल
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । दरवर्षी काही दिवस आपल्या घरी गणपती बाप्पा येतो आणि निघून जातो. कोणाकडे पाच दिवस येतो तर कोणाकडे दहा दिवस. मात्र या काही दिवसांमध्ये बाप्पाचा खऱ्या अर्थानं स्वागत आणि सेवा सर्वच नागरिक करत असतात. आणि ज्या दिवशी बाप्पाला विसर्जित करण्याची वेळ येते त्या दिवशी गुलाल हा उधळलाच जातोच. आणि अशाच काही गुलाल महाराष्ट्रातील एका शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उठायला गेला आहे.
नंदुरबारमध्ये सोमवारी २८ गणेश मंडळांतर्फे पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक निघाली. कोरोनामुळे २ वर्षे मिरवणुकाच नव्हत्या. त्यामुळे यंदा प्रचंड उत्साह होता. २० हजार गोण्या गुलाल या वेळी उधळण्यात आला. २०१९ च्या तुलनेत ५ हजार गोण्या अधिकच्या उधळल्या गेल्याने संपूर्ण विसर्जन मार्ग गुलालाने रंगला.
अग्निशमन दलाच्या पथकाने पाण्याद्वारे रस्ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. आता ९ सप्टेंबर रोजीही उर्वरित २५ मंडळांकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.