⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावात किमान तापमान घट! थंडीची लाट आणखी वाढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात किमान तापमान घट! थंडीची लाट आणखी वाढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह राज्यात बोचरी, गुलाबी थंडी जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके सर्वांत निच्चांकी ठरले. त्या पाठोपाठ जळगावसह अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, गोंदिया या ठिकाणचा पारा १० ते ११ अंशांवर खाली आला.

गुरुवारी राज्याचे सरासरी किमान तापमान 11 ते 12 अंशांवर खाली आल्याने अवघ्या राज्याला हुडहुडी भरली. शुक्रवारी बंगालच्या उपसागरात फेंगल नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याने वातावरणात आणखी बदल होऊन दाट धुके अन् थंडीची तीव्र 1 डिसेंबरपर्यंत वाढणार आहे.

जळगाव जिल्ह्याचे रात्रीचे तापमान घसरलं
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान ११ अंशांवर गेले आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडीचा मागमूस नव्हता. मात्र दोन दिवसांपासून किमान तापमान घसरू लागले आहे. आठवड्यात थंडीची लाट आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जळगाव जिल्ह्याचे दिवसाचे तापमान ३० अंशांवर आहे, तर रात्रीचे तापमान ११ अंशांवर आले आहे. त्यामुळे रात्रीचा पारा कमालीचा कमी झाल्याने लहान बाळांना गरम कपड्यासह त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.